संजय गांधी निराधार योजनेच्या वारसांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी)  : तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांच्या संजय गांधी निराधार योजनेच्या प्रस्तावांना तातडीने बैठक घेऊन मंजुरी देण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत निर्दे श दिले होते.

सिल्लोड तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी निराधार योजनेपासून वंचित असेल तर त्यांना या योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी तहसीलदार यांना दिले होते. त्या अनुषंगाने निराधार योजनेपासून वंचित लाभार्थ्यांना संचिका दाखल करण्याचे अवाहन करण्यात आले
होते. 
आमदार अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी याबाबत बैठक घेवून संजय निराधार योजनेच्या एकूण २५ तर श्रावण बाळ योजनाचे १ असे एकूण २६ संचिकांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी देण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांनी आपली केवायसी करून घ्यावी तसेच आधारकार्ड, बँक पासबुक यासारखे आवश्यक कागदपत्रे घेवून तहसिल कार्यालयातील निराधार योजनेच्या विभागाशी संपर्क साधला. बँक खाते उघडणे किंवा इतर अडचणी आल्यास माझे संपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे संपर्क साधला असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे.